मुंबई/प्रतिनिधी: चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650 व्या जयंती निमित्त चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्ट मंडळाची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे आज शनिवार (०६/१२/२०२५) बैठक पार पडली.
या वेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज ६५० वी जयंती महोत्सव समितीच्या शिष्टमंडळाने राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या आखरीत असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्याचबरोबर 650 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रभर जयंती महोत्सव साजरा केला जाणार असल्याने या जयंती महोत्सवासाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी करणारे निवेदनही या शिष्ट मंडळाने दिले.
चर्मकार समाजाच्या शिष्ट मंडळाच्या मागण्यांना उत्तर देताना,
चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व चर्मकार समाजाच्या अस्मितेसाठी, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650 व्या जयंती महोत्सव वर्षानिमित्त शासनाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते भरघोस स्वरूपात आणि सर्वतोपरी केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले. तसेच दादर येथील राजा शिवाजी विद्यालय येथे संपन्न होणाऱ्या १ फेब्रुवारीला 650 व्या जयंती महोत्सवाच्या, शुभारंभ समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमुद केले.
यावेळी शिष्टमंडळात विजय इंगळे, रवी पेवेकर, देवराम केदार, ज्ञानेश्वर ठोंबरे, धनंजय वायंगणकर, मयूर देवळेकर, हृदयनाथ खंदारे, गुरुदेव कांबळे, मनोहर खैरे, नवनाथ शिंदे व इतर समाज बांधव उपस्थित होते.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे हे वर्ष 650 वे वर्ष असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात जयंती महोत्सव वर्षभर गाव, तालुका व जिल्हा पातळीवर मोठ्या स्तरावर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिष्टमंडळाने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. तसेच पुढील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
१. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या नावे सर्व विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र असावे.
२. सर्व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा लावणे व जयंतीच्या शासकीय कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे.
३. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे चरित्र मा. अ. कारंडे लिखित पुनर्मुद्रण करून विक्रीसाठी उपलब्ध करणे.
४. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे नावे दरवर्षी व्यक्ती व संस्था यांना प्रत्येकी पन्नास पुरस्कार देणे.
५. मुंबईतील सायन रेल्वे स्टेशनला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे नाव देणे.
६. शालेय अभ्यासक्रमात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पाठ समाविष्ट करणे.
७. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त टपाल तिकीट व नाणे प्रकाशित करणे.
८. चर्मकार समाजासाठी नाशिक कुंभमेळ्यात स्वतंत्र मठ उपलब्ध करून देणे.
९. शासकीय निमशासकीय आस्थापनांना व कार्यालयांना जयंती कार्यक्रम अनिवार्य करणे.
१०. आळंदी पंढरपूर नाशिक येथे भव्य समाज मंदिर उभारणे.
११. बार्टीच्या धरतीवर लिडकॉम या महामंडळात संशोधन व विविध व्यवसाय प्रशिक्षण सुरू करणे.
१२. प्रत्येक तालुक्यात भव्य संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज मंदिर बांधणे.
१३. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ वर अध्यक्ष पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळाच्या नियुक्त्या.
१४. चर्मकार समाजाच्या जात दाखला साठी १९५० पूर्वीची अट शिथिल करणे.
१५. चर्मोद्योग, गटई कामगारांसाठी बस रेल्वे स्थानक एसटी स्टँड मोठी जागा द्यावी तसेच स्टॉलचे परवाने द्यावेत.
१६. शासकीय देवस्थानांवर समजतील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या कराव्यात.
१७. चर्मोद्योगासाठी मॉलच्या धर्तीवर विक्री केंद्रे, उत्पादन केंद्रे व चर्मोद्योग हब निर्माण करावेत.
१८. सर्व शासकीय निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाच्या निधीतून कोणत्याही आस्थापनेच्या प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीचा व पुण्यतिथीचा उल्लेख करणे.
१९. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या वाराणसी येथील जन्मस्थळाला भेट देण्यासाठी देवदर्शन या योजनेमधून मोफत दर्शन घडविण्यात यावे.
२०. संत शिरोबरी रोहिदास महाराज यांच्यावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती करून त्याचे हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये डब करून तिन्ही चित्रपट प्रदर्शित करावेत.
२१. मुंबई येथून वाराणसीला जाणाऱ्या एक्सप्रेस ला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे नाव देण्यात यावे.
२२. देशातील सर्व रेल्वे स्थानकात चर्मकार व्यक्तीसाठी चर्मोद्योग व्यवसायासाठी स्टॉल असावेत.
२३. संत रोहिदास शर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला भरघोस निधी द्यावा.
२४. भारताच्या संसद भवनामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी.
२५. भारत सरकारच्या एनईपी द्वारा निर्मित पाठ्यपुस्तकांमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे जीवन चरित्र व साहित्य समाविष्ट करावे.




