ताज्या बातम्या

फक्त ६०,००० रुपयांनी पाचुपतेवाडी ता. कराड येथील शाळेचा चेहरा मोहरा बदलला

कराड(अमोल पाटील) : ग्रामस्थ आणि श्री निनाईदेवी संस्थेच्या मोठ्या आर्थिक सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी व नवे तंत्रज्ञान शाळेत विकसित करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आणि निनाई देवी संस्थेच्या पुढाकाराने व तुळसण पाचुपतेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्यातून शाळेचे केवळ रुपडे पालटले नाही ,तर शाळेला डिजिटल युगात नेण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवण्यात आले आहे.
बाला पेंटिंग मुळे शाळेत बोलक्या भिंती निर्माण झाल्यामुळे शाळा आकर्षक झाली तसेच शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी शाळेच्या इमारतीवर *बिल्डिंग ऍज लर्निंग ऍड* या संकल्पनेवर आधारित आकर्षक रंगरंगोटीचे काम नुकतेच पूर्ण झाले. रंगरंगोटी साठी देणगीदाराकडून सुमारे ६०,००० रुपये इतका भरीव निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेचे वातावरण अधिक सुंदर,सुशील, नीटनेटकेपणा तसेच शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांसाठी खेळकर झाले आहे.
शाळेत डिजिटल शिक्षणासाठी संगणक संच भेट व रंगरंगोटीच्या कामासोबतच आजच्या डिजिटल युगाची गरज ओळखून शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी एक अद्यावत संगणक संच आणि प्रिंटर देखील भेट म्हणून देण्यात आला आहे. तांत्रिक शिक्षण व डिजिटल शिक्षण घेणे या स्पर्धेच्या युगात आवश्यक झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानामुळे नक्कीच भविष्यात फायदा होईल. ग्रामस्थ आणि श्री निनाई देवी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या शिक्षण क्षेत्रासाठी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि सक्रिय सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. शाळा व्यवस्थापन समितीने सर्व ग्रामस्थ ,पाचपुते वाडी आणि संस्थेचे विशेष आभार मानले आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top