मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेच्या वतीने बुथवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी कायदेविषयक मोफत सल्ला, मोफत नेत्र चिकित्सा व चष्म्यांचे मोफत वाटप याचबरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या विविध प्रचार साहित्याचे पॅप्फलेटचे वाटप या बूथवर केले जाणार आहे.याच बरोबर याच बुथवर आंबेडकरी अनुयायांना
मोफत अल्पोपाहाराचे वाटप केले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालय, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, व मुख्य न्यायदंडाधिकारी,लघुवाद न्यायालय मुंबई या न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने हे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत, हे सर्व कार्यक्रम चंद्रकांत बनकर,संजय शेलार, रवी पवार,शरद साळवे,किरण कांबळे,अमोल साळवे,निलेश तायडे, प्रशांत भोसले, सचिन हिवराळे,नागसेन मर्चंडे, निलेश भुजबळ आदींसह इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून होणार आहेत.




