मुंबई — अंधेरी पूर्व एमआयडीसीमधील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उद्या ५ डिसेंबर रोजी १२ वा.मध्यरात्री महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना
हजारो अनुयायी मानवंदना करणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन कोंडीवटे बुध्द लेणी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे,अशी माहिती प्रकाश कमलाकर जाधव यांनी दिली.
बौध्दाचार्य शिवाजी डोंगरे,विजय बाविस्कर हे यावेळेस बुध्द वंदना व भीमस्तुती करतील.नंतर सामूहिकपणे महामानवाला यावेळी मानवंदन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डाॅ.सूर्यकांत देवळेकर तर प्रमुख उपस्थिती आमदार मुरजी पटेल यांची राहणार आहे.याचबरोबर भीमराव कांबळे,विठ्ठल इंजे,भिमराव गमरे,शंकर सुर्वे,शिवदास साळवी,विशाल लादे,राजू पाईकराव,विशाल लष्करे,राजेश गमरे,रोशन जाधव,प्रसन्ना कांबळे,अरुण भोरकडे,सुरेश सावंत,माधव गायकवाड,जनप्पा बनसोडे हे कोडींवटे बुध्द लेणी बचाव कृती समितीचे पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय माजी नगरसेवक क्लाईव डायस,रसूल पठाण,रतन अस्वारे,प्रकाश खंडागळे,गंगाधर मुळे,संजय खंडागळे,अॅड अमित ससाणे,डाॅ.राजन माकणीकर,नवीन लादे,राजेश भालेराव,शिवनाथ खैरनार,बाबुराव सुमोरे आदी मान्यवरही यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.




