ताज्या बातम्या

शाळा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकांची सहभागाची तयारी; ५ डिसेंबरला मागण्यांचे निवेदन

मुंबई : ५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित शाळा बंद आंदोलनात मुंबईसह राज्यातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असून त्यानंतर मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयात देण्यात येणार आहे.

टीईटी सक्ती आणि १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवक ही योजना कायमस्वरूपी रद्द करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच अतिरीक्त शिक्षकांचे मुंबईत समायोजन करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात देण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ समाजवादी नेते व माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून शिक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“हर जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है!” असे प्रतिपादन करत शिक्षकांनी एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक भारती मुंबईच्या अध्यक्षा कल्पना शेंडे यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top