मुंबई(रमेश औताडे) : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्तेच्या सारीपाटात नेमके कोणते स्थान आहे व भविष्यात कार्यकर्त्यांना राजकारणात संधी कशी मिळेल यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने मुंबईत संदेश मार्च आयोजित केला आहे. संदेश मार्च चे नेतृत्व आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे करणार आहेत.
५ डिसेंबर दुपारी २.०० वाजता चेंबूर येथिल सिद्धार्थ काॅलोनी येथून मार्च प्रारंभ होईल. गोवंडी, मानखुर्द, लाल डोंगर, रमाबाई घाटकोपर, कन्नमवार, विक्रोळी, भांडुप, मु़ंलूड, कलवा, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, दिवा, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, सायन, प्रतिक्षा नगर येथे संवाद साधत आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी कशी मिळेल याचा ऊहापोह करण्यात येणार आहे.
६ डिसेंबर रोजी सायंकाळी फुल बाजार कामत हाँटेल येथून चेतना मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. या मार्च मध्ये राष्ट्रीय महासचिव उद्धव तायडे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, मुंबई प्रभारी विकास काटे, प्रा.रमेश दुपारे, प्रविण आवळे, जयदेव चिंवडे, पौर्णिमा पाईकराव, वैशाली दुप्पटे, संगिता जेस्वार, गिता पाखरे, राजु सोनवणे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत मार्च संपूर्ण चैत्यभूमी परिसरात जनजागृती करत आंबेडकरी समाजाच्या मतदारांचे महत्त्व किती आहे हे पटवून देण्यासाठी जनजागृती करणार आहे असे शामभाई बागुल यांनी सांगितले.




