ताज्या बातम्या

श्रीराम वैद्य यांना “कोकण रत्न पदवी-२०२५ ” जाहीर

मुंबई (शांताराम गुडेकर) : विक्रोळी पार्क साईट येथील गुणवंत कामगार पुरस्कार-महाराष्ट्र शासन विजेते तसेच त्यांच्या पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री. श्रीराम विष्णू वैद्य यांची स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच “कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.वैद्य यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्रीराम वैद्य हे गेली ४५ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. अनेक संघटनांवर पदाधिकारी,सदस्य म्हणून काम पाहत आहेत.त्यांना आजवर विशेष कार्यकारी अधिकारी,गणुवंत कामगार पुरस्कार, आदर्श मित्र पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार, मुंबई रत्न पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, कोकण दिप सामाजिक सेवा पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रयत सेवक पुरस्कार, आदर्श मुंबईकर महापौर सन्मान पत्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे गौरव पत्र, नशाबंदी मंडळ नागरिक समिती गौरवपत्र, रक्तदान शिबिर प्रशस्तीपत्र, कामगार सभा आकाशवाणी मुलाखत, नागरी संरक्षण दल, बृहनमुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप, स्वकुळ वैभव पुरस्कार व संकल्प कृतार्थ जीवन गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.ते कार्यकारी सदस्य महाराष्ट्र गुणवंत कामगार संघटना मुंबई,रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई चे सदस्य आहेत.नेत्र तपासणी व चष्मा वाटप, एडस जनजागृती अभियान, पोलीओ डोस अभियान, बाल माता संगोपन शिबीर, शारीरिक वैद्यकिय तपासणी, मार्गदर्शन व उपचार केंद्र आदी शिबीर मध्ये त्याचा मोलाची कामगिरी आहे.शिवसेना ग्राहक संरक्षण मंच, गुरूदत्त मंडळ (कला, क्रिडा, शैक्षणिक) वि. पा. शा. मुंबई सल्लागार, वि. पा. सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – सदस्य आहेत.श्री.श्रीराम विष्णू वैद्य (विशेष कार्यकारी अधिकारी,(डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलो शिप विजेता)यांना सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाची पदवी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनसह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top