प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वहागांव मध्ये बदली होऊन जाणाऱ्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या सोबत पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा भावुक झाली. चार वर्ष शिक्षकांनी मनोभावे सेवा देत मुलांची गुणवंत्ता वाढवण्याचे काम केले. अनेक स्पर्धा परीक्षेत मुलांना उतरवून चांगले यश मिळवून दिले तसेच खेळांच्या स्पर्धामध्ये सुद्धा शाळेचे नाव तालुक्यात नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सेमी इंग्रजी माध्यमातून मुलांना तयार करण्यासाठी शिक्षकांनी खुप मेहनत घेतली होती. प्रसंगी मुलांना रागावून कधी प्रेमाने मुलांना तयार करत संस्कार देण्याचे काम शिक्षकांनी केले. त्यास ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने चांगली साथ दिली. ग्रामपंचायतने सुद्धा भौतिक सुविधा व इतर सोयी सुविधा पुरवून शिक्षकांचे मनोबल वाढवले
सर्वं महिला शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समिती कडून माहेरची साडी देऊन सत्कार करण्यात आला. मुलांच्याकडून लहान लहान भेटवस्तू शिक्षकांना भेट देण्यात आल्या तसेच जाणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा शाळेविषयी कायम आत्मीयता व प्रेमाचे नाते राहील असे भावुक उदगार काढले
भविष्यात शाळेमध्ये येत राहू व लागेल ती मदत करू असे आश्वासन या प्रसंगी शिक्षकांनी दिले
प्रभारी मुख्याध्यापक नेहा पवार, शिक्षका सुवर्णा पाटील, वनिता रेपाळ, राऊत मॅडम, विरकर मॅडम, कुंभार मॅडम यांना शाळेतून निरोप देण्यात आला
कार्यक्रमास वहागांवचे आदर्श सरपंच संग्रामबाबा पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अश्विनी पाटील, उपाध्यक्ष कृष्णत पवार, सदस्य धर्मराज शिंदे, मंजुषा पवार, रोहिणी नलवडे, अश्विनी पवार, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पुजारी, आनंदी पवार नवीन मुख्याध्यापक संभाजी भोसले सर, गुजर मॅडम, रोकडे मॅडम, खाबाले मॅडम, पारवे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते




