ताज्या बातम्या
‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्थेचा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न“पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला जनता धडा शिकवेल” — वसंत व्याख्यानमालेत अरविंद सावंत यांचे प्रतिपादनजागतिक हिवताप दिनानिमित्त नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन     “१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान” छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

सोशल मीडियाची हवा, पण मतपेटीत अपयश; कारेगाव गणात रील स्टार सरपंच निर्मला नवले यांचा ३९३ मतांनी पराभव

पुणे : कारेगावच्या सरपंच निर्मला नवले या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे, कधी पेहरावामुळे तर कधी आलिशान गाड्यांच्या आवडीमुळे त्या प्रकाशझोतात राहिल्या. मात्र यावेळी त्या चर्चेत आल्या आहेत, त्या थेट निवडणूक पराभवामुळे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी ३९३ मतांनी पराभव केला. नवले यांना ६५००, तर पाचंगे यांना ६६९३ मते मिळाली. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता असूनही प्रत्यक्ष निकालात पराभव पत्करावा लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रचाराच्या काळात नवले यांच्या सभांना मोठी गर्दी, फेसबुक लाईव्ह, युट्यूब व्हिडिओ आणि इन्स्टाग्राम रील्समुळे त्यांचा प्रचार डिजिटल पातळीवर प्रभावी दिसत होता. मात्र ही ऑनलाइन लोकप्रियता प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतरित झाली नाही. याउलट भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी डोअर-टू-डोअर प्रचार, स्थानिक कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि महिला मतदारांशी थेट संवाद साधत विश्वास संपादन केला.
नवले यांच्या लक्झरी जीवनशैलीचा, विशेषतः रेंज रोव्हर गाडीबाबतचा व्हायरल व्हिडिओ विरोधकांसाठी आयतं हत्यार ठरला. ‘सामान्य जनतेपासून दूर गेलेली नेता’ अशी प्रतिमा तयार झाल्याचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जात आहे. तसेच पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस मांडणी प्रभावीपणे न पोहोचल्याचाही आरोप केला जातो.
संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादीकडून अपेक्षित ताकद उभी राहिली नाही, तर भाजपने बूथ पातळीवर प्रभावी यंत्रणा राबवत मतांचे ध्रुवीकरण केले.
‘इन्स्टास्टार सरपंच’ ही ओळख सुरुवातीला जमेची वाटली, मात्र निवडणुकीत तीच दुधारी तलवार ठरली. या निकालाने सोशल मीडिया विरुद्ध ग्राऊंड रिअॅलिटी यातील फरक पुन्हा एकदा स्पष्ट केला असून, अजित पवार गटासाठीही हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे.

Scroll to Top