कराड(प्रताप भणगे) : कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ व चोरीस गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे एकूण 25 मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले. डी.बी. पथकाच्या सतत पाठपुराव्याचा मोठा परिणाम दिसून आला असून सन 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 25 लाख रुपये किंमतीचे 85 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोध मोहिमेस गती देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (प्रभारी कराड तालुका पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने सखोल तांत्रिक विश्लेषण करून कर्नाटक राज्य तसेच कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतून हरवलेले / चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले.
आज दि. 24/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, मोबाईल हरवल्यास अथवा चोरी झाल्यास घाबरू नका. पोलिसांवर विश्वास ठेवा आणि तात्काळ कराड तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधा तसेच CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवा, ceir.gov.in. ही कामगिरी खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली : सपोनि सखाराम बिराजदार,पोउनि धनंजय पाटील,सफौ. नितीन येळवे,पो.हवा. सचिन निकम,पोना. किरण बामणे, विनोद माने, पो.कॉ. मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे, रविंद्र देशमुख आदींनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.
कराड तालुका पोलीस स्टेशनकडून नागरिकांना दिलासा हरवलेला मोबाईल आता नक्की मिळतो, फक्त तक्रार करा!




