ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

विधान परिषद निवडणूक २६ जूनला

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून या दिवशी होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक अन् मुंबई शिक्षक मतदार संघ येथे ही निवडणूक होणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार ३१ मे ते ७ जून अर्ज भरणे, १० जून अर्जाची पडताळणी, १२ जून अर्ज मागे घेणे, २६ जून मतदान, तर १ जुलै या दिवशी मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे या लोकप्रतिनिधींचा ६ वर्षांचा कालावधी संपणार असल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.

Scroll to Top