पनवेल(अमोल पाटील) : ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष जनार्दन पाटील यांचे वडील कै. जनार्दन नामदेव पाटील (आप्पा) यांचे दिनांक मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आप्पा जरी देहाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी व संस्कार आजही कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मनात कायम जिवंत आहेत.
कै. जनार्दन नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रंथ वाचन व भजनांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
🔹 २० नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. जगदीश महाराज सारडेकर
रात्री ९.०० ते ११.०० : हनुमान प्रसादिक भजन मंडळ (आजीवली)
🔹 २१ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. जनार्दन महाराज पाटील (आष्टे)
रात्री ९.०० ते ११.०० : दत्त माऊली भजन मंडळ (भातान)
🔹 २२ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. नामदेव महाराज माळी (आजीवली)
रात्री ९.०० ते ११.०० : जय हनुमान प्रसादिक भजन मंडळ (भातान)
🔹 २३ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. लक्ष्मण महाराज म्हस्कर (मोहे)
रात्री ९.०० ते ११.०० : विठ्ठल रुक्माई भजन मंडळ (लोणीवली)
🔹 २४ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. अरुण महाराज (बेलवली)
रात्री ९.०० ते ११.०० : गावदेवी भजन मंडळ (आरवली)
🔹 २५ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. सुरेश महाराज पाटील (कोन)
रात्री ९.०० ते ११.०० : विठोबा प्रसादिक भजन मंडळ (केरे)
🔹 २६ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० ग्रंथ वाचन : ह.भ.प. सुरेश महाराज पाटील (बेलवली)
रात्री ९.०० ते ११.०० : जय हनुमान विठ्ठल रुक्माई भजन मंडळ (ऊसर्ली)
🔹 २७ नोव्हेंबर २०२५ — ग्रंथ वाचन : ह.भ.प. संतोष महाराज सते (भातान)
भजन : जय हनुमान भजनी भारुड मंडळ (बोर्ले)
🔹 २८ नोव्हेंबर २०२५ — रात्री ९.०० ते ११.०० : माऊली कृपा प्रसादिक भजन मंडळ (पाली खुर्द)
🔹 २९ नोव्हेंबर २०२५ — सायं. ६.०० ते ८.०० कीर्तन : ह.भ.प. सुप्रियाताई भालेकर (वाजे चेरवली)
दशक्रिया विधी गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे पार पडणार आहे.
रविवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० — जागर भजन (आजिवली पंचक्रोशी).
रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० — प्रवचन : ह.भ.प. संदीप महाराज यादव (आसरेवाडी).
आप्पा अत्यंत साधी राहणी, मनमिळावू स्वभाव आणि चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य अशी ओळख असलेले होते. कुटुंबाप्रती प्रेम, मुलांच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष व सामाजिक बांधिलकी यामुळे ते ग्रामस्थांच्या हृदयात कायम स्मरणात राहतील.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.




