पाचगणी(अजित जगताप) : थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी शहर म्हणजे जागतिक स्तरावरील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सात वर्षाच्या प्रदीर्घ विलंबानंतर निवडणूक होत आहे. ही निवडणूक म्हणजे पुन्हा आश्वासनाची खैरात असे न होता कर्तबगार व कर्तव्यदक्ष नगरसेवक निवडून देण्यासाठी एक संधी आहे. पाचगणीत लक्ष्मीच्या वापराने विकासाचा मकरंद पुन्हा आणण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सध्या इच्छुक उमेदवार श्री हरीश शिवराम गोळे यांच्या प्रचारामध्ये मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे विजयश्री नजदीक आलेला आहे.
पाचगणी शहराचा परिपूर्ण अभ्यास करणाऱ्या मुठभर लोकांपैकी हरीश गोळे हे एक समाज उपयोगी काम करणारे व व्यक्तिगत प्रगती पेक्षा सामाजिक प्रगती कडे
लक्ष वेधून घेणारे नेतृत्व आहे .
आज पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व जण त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशी राजकीय परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांनी जे यश मिळवलेले आहे. हेच यश त्यांच्या भविष्यातील विजयाचे यमक ठरणार आहे.
पाचगणीतील महत्त्वाचे म्हणजे गावठाण आणि हद्दवाढ भागांचा विकास होय. पाचगणी पर्यटन स्थळ असलेल्या शहराला भेडसावणारा गावठाण आणि
हद्दवाढ हा प्रश्न पहिल्यांदा मिटवणार आहे. यासाठी त्यांनी दोन वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत.
पाचगणी नगरपालिकेच्या करा मध्ये त्याचे रूपांतर होत नाही. दुसऱ्या बाजूला कायदेशीर रित्या संपूर्ण कामे करून पाचगणी शहराच्या वैभव मध्ये भर घालणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेची संरक्षण करणे. तितकेच गरजेचे आहे. पाचगणी शहरातील लीज प्रापर्टी प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबीत आहेत. पाचगणी शहरातील आरक्षणाचा प्रश्न भिजत घोंगडे पडलेला आहे. पाचगणीत खेळाचे क्रिडांगण नाही. या भागांमध्ये रस्ते, पाणी आणि वीज या नागरी सुविधा सुद्धा वेळेत मिळत नाही. पर्यटन स्थळी सर्विस सुविधा असेल तर पर्यटक त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येऊन स्थानिकांचा रोजगार उपलब्ध करतात. आज पर्यटकांची आकडेवारी पाहिली तरी इतर पर्यटन स्थळापेक्षा पाचगणी मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे. ती वाढवण्यासाठी नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. हे काम करणारे स्थानिक नागरिक आहेत. त्यांच्याही मदतीला धावून जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री हरीश गोळे हे नेहमी तत्पर असतात. निवडणुका म्हणजे आठ दिवसाचा खेळ आहे. परंतु, माणुसकी ही त्यांनी जन्मापासून आत्मसात केलेली आहे. त्यामुळे एक माणुसकी धर्म पाळण्यासाठी या निवडणुकीत उतरले आहेत. जेणेकरून शासकीय योजनांचा त्यामध्ये समावेश झाल्यास सामाजिक जोड मिळणार आहे. पाचगणी मध्ये अनेक प्रामाणिक अधिकारी झालेले आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने शासकीय काम करण्यास लोकांचा सहभाग वाढवला तर निश्चितच फायदा होणार आहे .आणि त्या अनुषंगाने एक नवीन पाऊल टाकले जाणार आहे.
श्री हरीश गोळे हे निवडणुकीत उमेदवार असले तरी ते कोणाचे स्पर्धक नाहीत. तर प्रत्येक नागरिकाचे ते सेवक आहेत. सेवेकरी म्हणूनच ते पाचगणी नगरपालिकेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. हे त्यांनी मनापासून स्पष्ट केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते व मतदार सक्रिय सहभागी होत आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण नक्कीच आहे. त्यापेक्षाही जागरूक व प्रकल्प आणि विकासाचे व्हिजन ठेवणारे मतदार आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने पाचगणीच्या विकासाचे साक्षीदार म्हणून मतदार पुढे येत आहेत. असे श्री हरीश गोळे यांनी सांगितले.




