ताज्या बातम्या

उंडाळ्यात 50% सवलतीत स्कुटर–सायकल–वॉटर फिल्टर वाटप स्टॉलचे भव्य उद्घाटन

कराड(प्रताप भणगे) : भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा. पंकज पाटील यांच्या उपक्रमातून तमाम जनतेसाठी 50% सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक स्कुटर, रेंजर सायकल व वॉटर फिल्टर वाटप स्टॉलचे भव्य उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य मा.आ. मा. श्री. आनंदराव पाटील (नाना) व य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा. श्रीरंग देसाई (तात्या) यांच्या हस्ते झाले. पंकज पाटील यांच्या सामाजिक कार्याचे आमदार नानांकडून कौतुक

या वेळी मनोगत व्यक्त करताना आ. आनंदराव पाटील (नाना) म्हणाले,“उंडाळे विभागामध्ये आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे सामाजिक कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पंकज पाटील उत्कृष्टरीत्या करीत आहेत. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे, समाजातील सर्व घटकांना न्याय देणे आणि विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांसाठी 50% सवलतीत वस्तू उपलब्ध करून देणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे कार्य पुढेही सुरू राहो.”

समाजहिताचे उपक्रम सातत्याने — प्रा. बाजीराव शेठे यांचे मनोगत

प्रा. मा. बाजीराव शेठे यांनी सांगितले, उंडाळे भागात भाजपा वाढवण्यामध्ये व नवीन कार्यकर्ते जोडण्यात पंकज पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मोफत आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप, खाऊ वितरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर अशा समाजहिताच्या उपक्रमांमध्ये ते सतत कार्यरत असतात.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ. सुरेश पाटील, मनव विकास सेवा सोसायटी चेअरमन मा. संताजी शेवाळे, टाळगाव मा. उपसरपंच मा. जयसिंगराव जाधव (तात्या), म्हासोली मा. सरपंच मा. आण्णासाहेब शेवाळे, येळगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन प्रा. मा. बाजीराव शेठे (सर), म्हासोली मा. सरपंच मा. दिनकरराव पाटील, साळशिरंबे मा. उपसरपंच मा. जयवंतराव यादव (आबा), ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे संचालक मा. मारुती शेवाळे, तसेच विविध सोसायटी, सरपंच, भाजपा पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाचे वैशिष्ट्य

🔸 50% सवलतीत इलेक्ट्रिक स्कुटर
🔸 50% सवलतीत रेंजर सायकल
🔸 50% सवलतीत वॉटर फिल्टर
🔸 विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपक्रम

या उपक्रमामुळे उंडाळे व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top