मुंबई (मोहन कदम) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मु. पो. कासार कोळवण गावचे ज्येष्ठ नागरिक व मुंबई येथील वडाळा येथे वास्तव्यास असलेले श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे माजी पदाधिकारी काशीराम सिताराम तोरस्कर ( वय- ७८ वर्ष )यांचे अल्पशा आजाराने(दि. २० नोव्हेंबर २०२५)रोजी आकस्मित दुःखद निधन झाले.तरी त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांचा परिवार वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांचा कुटूंबाच्या दुःखात कासार कोळवण ग्रामस्थ सहभागी आहोत.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी यानिमित्ताने ईश्वर चरणी प्रार्थना करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या दुःखात संघर्ष विकास समिती,कांडकरी विकास मंडळ,श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ,नवतरुण मित्र मंडळ व तोरस्कर बंधू परिवार व समस्त कासार कोळवण ग्रामस्थ सहभागी आहेत.
कासार कोळवण गावचे ज्येष्ठ नागरिक आणि विविध विषयांवरील तज्ज्ञ भाष्यकार काशीराम सिताराम तोरस्कर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे हे ऐकून वाईट वाटले.मृतात्म्यास चिरशांती प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली.कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.स्व.आदरणीय काशीराम सिताराम तोरस्कर यांचे अनुभवसंपन्न आणि समाधानी दीर्घायुष्य नेहमीच प्रेरणादायी राहील असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यांची माती सावरणे सात दिवसाने व उत्तर कार्य रविवार दिनांक ३०/११/२०२५ रोजी गावी राहत्या घरी मु.पो.कासार कोळवण ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन मुलगी, सून,नातवंडे,भाऊ,भावजई असा मोठा परिवार आहे.




