कराड(अमोल पाटील) : काले तालुका कराड येथील व्यंकनाथ देवाची यात्रेनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस श्री नानासाहेब पैलवान व मित्रपरिवार यांच्या वतीने जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. मैदानात ६५ चटकदार कुस्त्या झाल्या. अकलूजच्या सतपाल सोनटक्के कडून माळशिरस च्या धनाजी कोळी डंकी डावावर चित्रपट करून एक लाखाचे बक्षीस जिंकले. कुस्तीप्रेमींची वाहवाच्या आवाजाने काले मैदान दुमदुमले.
मुंबई येथील चंद्रभागा रुलर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन श्री दीपक शेठ लोखंडे यांच्या सौजन्याने प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. या कुस्ती मैदानात खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेश युवक काँग्रेस श्री शिवराज मोरे, माजी विरोधी पक्षनेते श्री जयंतराव जगताप व संयोजक श्री नानासाहेब पाटील यांच्या हस्ते सतपाल सोनटक्के व धनाजी कोळी यांची कुस्तीस प्रारंभ झाला.
कुस्ती मैदानात पुरस्कारांची परंपरा जपून महाराष्ट्र केसरी संजय पैलवान यांच्या स्मरणार्थ श्री सचिन कळंत्रे यांच्या सौजन्याने श्री खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नामदेवराव मोहिते यांना कुस्ती भूषण, दिघंची येथील महाराष्ट्र चॅम्पियन श्री ज्ञानेश्वर दंगे यांना आदर्श वस्ताद, प्राचार्य धनाजी काटकर यांना कुस्तीप्रेमी, विंगचे उपसरपंच श्री सचिन पाचुते यांना आदर्श सरपंच, श्री रामदास शिंगारे यांना आदर्श उद्योजक, श्री अभिजीत लोहार यांना युवा उद्योजक, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संजय कुंभार यांना आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
काले कुस्ती मैदानात श्री नानासाहेब पाटील व मित्रपरिवार यांच्या वतीने यशस्वी मैदान पार पडले. कुस्ती क्षेत्रातून आयोजकांचे कौतुक केले जात आहे.




