मुंबई – कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा ४५ वा वर्धापनदिन उद्या गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन,दादर येथे सकाळी ११.३० पासून साजरा होणार आहे,असे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिलभाऊ निरभवणे यांनी सांगितले.राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे एस.टी.चे ड्रायव्हर,कंडक्टर यासह एस.टी.च्या सर्वच कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे मासिक पगार दिलाच पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार या वर्धापनदिनानिमित्त करण्यात येणार आहे.शिवाय या मागणीच्या पूर्ततेसाठी भविष्यातील आंदोलनाची दिशाही ठरविली जाणार आहे.यामुळे संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस या कार्यक्रमात काय बोलणार याकडे एस.टी. कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते होईल.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार- शिवसेना शिंदे गटाचे नेते- अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उत्तमराव खोब्रागडे , माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस तथा आयबीसेफचे अध्यक्ष सुनिल निरभवणे, आयबीसेफचे सरचिटणीस अॅड एस. के. भंडारे, आयबीसेफचे उपाध्यक्ष तथा ऑल इंडिया बँकींग मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे नेते शरद कांबळे, कास्ट्राईबचे कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, कार्याध्यक्ष विजय नंदागवळी, वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मिक येलेकर, अॅड उदय मालाधारी,कुवरलाल तिलगामे, राजेंद्र माहूरे, जीवन जाधव,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे संस्थापक सदस्य देवा पवार, शशिकांत ढेपले, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, सी.डी. आढाव,एम. जी. कांबळे, गौतम कांबळे, जनार्दन लोंढे,के. एस. भोले, देविदास दामोदरे,बी एस खंडारे, नंदरत्न खंडारे, गणेश कांबळे, रविंद्र मांडवे, संजय पोवार यांच्यासह राज्यातील विविध विभागातून प्रमुख पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते असलेले एस. टी. कामगार उपस्थित राहणार आहेत.
*माजी अध्यक्ष,माजी सरचिटणीस यांचा सत्कार*
या वर्धापनदिन सोहळ्यात संघटनेचे माजी अध्यक्ष पी. टी. खंडारे, माजी सरचिटणीस धम्मप्रिय हातेकर, विश्वनाथ खांडेकर,आर. एस. फुलकर, अभिमन्यू लोखंडे, रामचंद्र हिरे भाऊ यांचा त्यांनी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात दिलेल्या संस्मरणीय योगदानाबद्दल त्यांचा खास सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धी सचिव विश्वनाथ जाधव यांनी दिली.



