ताज्या बातम्या

शिवसेना वैद्यकीय कक्षाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – दिव्यांग बांधवांसाठी ‘जयपूर फूट’ वितरण

ाणे – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ८ वा वर्धापन दिन आज दि. १७ नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रमुख भाग असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी आयोजित मोफत जयपूर फूट वितरण शिबिराचे उद्घाटन एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. शिबिरात अनेक दिव्यांग बांधव लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन लाभ मिळवला.
यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून या कक्षाच्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यात येत आहेत. कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम उत्तम सेवा व उपक्रम राबवत असल्याचे शिंदे साहेबांनी नमूद केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top