ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील 23 साहित्यिकांचा ‘स्पंदन’ कडून पुरस्काराने गौरव

Koतळमावले/वार्ताहर : महाराष्ट्र शासन, मान्यताप्राप्त सहाय्य धर्मादाय आयुक्त संलग्न व आयएसओ मानांकनप्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रातील 23 साहित्यिकांचा राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

या गौरव सोहळयाप्रसंगी साम टीव्ही न्यूज चे संपादक निलेश खरे, महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डाॅ.विनोद बाबर, सुप्रसिध्द गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, टीव्ही 9 मराठीच्या वृत्तनिवेदिका सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, रयत विद्यार्थी विचार मंच चे अध्यक्ष ॲड.धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, डाॅ.संदीप डाकवे, स्पंदन डाकवे, स्पंदन डाकवे, सांची डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गेली तीन वर्षापासून ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्य प्रकारांना सन्मानपत्र, गमजा, आयडेंटी आणि ग्रंथ देवून गौरविण्यात येते. आतापर्यंत सुमारे 50 साहित्यिकांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 100 पुस्तकामधून 23 लेखक व पुस्तके यांचा पुरस्कार देवून गौरव केला आहे.पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे: डाॅ.प्रभाकर शेळके (डबल ढोलकी), प्रा.विश्वजित जाधव (आठवणींच्या सावल्या), दिव्या बाबर (शब्दांच्या वाटेवर), प्रा.रत्नमाला शिंदे-स्वामी (गुंफण), दिनेश फडतरे (रॅंडम), रेखा दीक्षित (मौनातला चाफा), सौ.सविता माने (वृंदावनातील महानंदा), चंद्रकांत पोतदार (प्रहाराच्या एैरणीवर), शरद अत्रे (रंग निसर्गाचे), दत्तात्रय शिवराम हिर्लेकर-गुरुजी (कर्तव्यपूर्ती), प्रा.अलका सपकाळ (फुलांची शाळा), सौ.आरती लाटणे (टेक ऑफ काशी यात्रा), सौ.शिला माने (देश-विदेशी खेळांची रुपरेषा), विनायक कुलकर्णी (आभार वेदनांचे), सत्यवान मंडलिक (स्वातंत्र्याची 75 वर्षे), सौ.अलका कोठावदे (सैताणी त्रिकोण), सौ.अनिता गोरे (क्रांतीयोध्दा), सोमनाथ आवडाजी पगार (कारुण्यबोध), डाॅ.सुनिता चव्हाण (इच्छामरण), पंढरी बनसोडे (आक्रोश), प्रा.इंद्रजीत पाटील (चिबाड), सचिन पाटील (फक्कड), विक्रांत केसरकर (संगतिचो शिमगो),
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासोबतच वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचं झाड, स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, पुस्तक भेट अभियान, निबंध स्पर्धा, ग्रंथालयांना पुस्तके भेट, शासनाच्या वाचन चळवळ उपक्रमात सहभाग, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, स्पंदन एक्सप्रेस मधून लिखाणाला प्रोत्साहन याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे, सुत्रसंचालन सौ.अंजली गोडसे तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे (फौजी), चंद्रकांत चव्हाण, यशराज चव्हाण, गुलाब जाधव (फौजी), भिमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पुनम जाधव, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top