ताज्या बातम्या

म्हसवड मध्ये शेखर भाऊंच्या टाचणीने आघाडी- महायुतीचा फुगा फुटणार?

म्हसवड(अजित जगताप) : दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आघाडी व महायुती जागावाटप होत असतानाच युवा नेते व सातारा जिल्ह मध्यवर्ती बँकेचे संचालक
शेखरभाऊ गोरे यांनी दमदार एन्ट्री केली आहे. त्यांनी टाचणी टोचल्यामुळे म्हसवड सत्तेच्या स्पर्धेतील आघाडी व माहितीचा फुगा फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुदत संपूनही चार वर्ष लांबणीवर पडलेल्या म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची शहरात सध्या राजकीय आखाडा गाजू लागला आहे. म्हसवड रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणी आले. त्यावेळेला युवा नेते शेखरभाऊ गोरे व त्यांच्या समर्थकांनी मदतीसाठी धावून गेले होते . आता आघाडी व महायुती सत्ता मिळवण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदासाठी मोर्चा बांधणी करत आहे.
म्हसवड दहा प्रभागामधून वीस नगरसेवक व नगरसेविका निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व समर्थक पळवा पळवी सुरू झालेली आहे.
राजकीय दृष्ट्या बॅलेंसिंग व वोटिंग पॉवर असलेले युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी थेट राजकीय चर्चा करण्याऐवजी कृती करून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. रिंग मास्टर बनूनच ते म्हसवड नगरपरिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
इच्छुक उमेदवारांचे अर्ज
दाखल करण्याच्या सहाव्या
दिवशी माणचे युवा नेते व जिल्हा बँकेचे
संचालक गोरे यांनी म्हसवड शहरात शक्ती प्रदर्शन केले . अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात लोक जमल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मतांची विभागणी होण्यापेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराचीच विभागणी होणार आहे. यामध्ये युवा नेते शेखरभाऊ गोरे निश्चितच यश संपादन करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच प्रचारालाही दमदार सुरुवात झाली आहे.
उमेदवारांचे अर्ज भरताना युवा नेते शेखर
गोरे तसेच म्हसवड राजघराण्यातील माजी नगराध्यक्ष विलासराव माने. दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सुरेखाताई पखाले,सोनलताई गोरे, सिध्दनाथ सहकारी
पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव
रणजीत लोखंडे, प्रमोद लोखंडे व पहिल्या फळीतील प्रचारक व स्थानिक मतदारांची लक्षणीय संख्या दिसून आली.म्हसवडच्या राजकारणात योग्य वेळी धडाकेबाज पॉलिटिकली पॉवर एन्ट्री करीत पहिल्या टप्प्यात सात उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखीन अर्ज दाखल होण्याची तयारी झाली आहे.
म्हसवड नगराध्यक्ष पदासाठी येथील
माजी नगराध्यक्ष माने यांच्यासुनबाई सौ. गौरी विशाल माने यांचा तर इतर प्रभागातुनही प्रभाग क्र.१ मधुन सोमनाथ अजिनाथ कवी, प्रभाग क्र. २ ट मधुन किर्ती आनंदा मासाळ
व त्याच प्रभागातुन त्यांचे पती आनंदा
महादेव मासाळ, प्रभाग क्र. ३ विक्रम
लोखंडे, प्रभाग क्र. ५ मधुन मोनिका
महेश लिंगे, प्रभाग क्र. ७ मधुन प्रतिक्षा
सोमनाथ कवी, प्रभाग क्र. ८ मधुन
धनंजय रामचंद्र माने यांनी समर्थकांसह अर्ज दाखल केल्यामुळे नगर परिषदेच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेले आहे.
म्हसवड नगरपरिषदेसाठी सौ . गौरी विशाल माने,सौ .भुवनेश्वर देवी राजमाने , सौ सुवर्णा सुनिल पोरे, प्रा .कविता म्हेत्रे, सौ स्नेहल युवराज सूर्यवंशी, अर्पिता भट, संध्या वीरकर, सौ सविता मासाळ यांच्या नावाची चर्चा होत असतानाच अनेक अर्ज दाखल झाल्यामुळे चांगली चुरस निर्माण झालेली आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अभियंता सुनील पोरे, महायुती व महाविकास आघाडीचे मान्यवर नेते, विशेषता राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे महादेव जानकर ,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख ,सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, किशोर सोनवणे, आजिनाथ केवटे, राजकुमार डोंबे, यांच्यासह अनेक अपक्षांनी चांगलीच तयारी केली आहे. इच्छुक उमेदवार निवडून आणण्यापेक्षा त्याच्या पराभवासाठी आतापासूनच अनेकांनी पायात भिंगरी लावली आहे त्यामुळे गुलाल नेमका कोणत्या उमेदवाराच्या अंगावर पडेल? हे आता सांगणे कठीण झाले आहे. एकेकाळी तुमच्यासाठी काय पण म्हणणारे… आताच्या घडीला म्हसवड नगर परिषदेसाठी तुमच्यासाठी आडवा आडवी पण… असे म्हणू लागलेले आहेत.
म्हसवड नगर परिषदेच्या राजकारणात धनगर, मराठा व बी.सी., ओ.बी.सी., अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर राजकारण फिरते. आज मताची विभागणी हेच राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. म्हसवड व आजूबाजूच्या बारा वाड्यातील सुमारे तेहवीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. युवा नेते शेखर भाऊ गोरे यांनी निवडणुकीत उडी घेतल्यामुळे चांगली रंग भरणी झालेली आहे. त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला आहे. नाण्याच्या दोन बाजू असतात. परंतु तिसरी बाजू म्हणजे ज्या ठिकाणाहून नाणी घसरून खाली जाते. असं त्रिकूट पाहण्यास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.——- ——- ——- ——- ——- ——- —
फोटो — म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शन करताना युवा नेते शेखर भाऊ गोरे (छाया– अजित जगताप, म्हसवड)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top