कोकण (शांताराम गुडेकर) : खेड्यापाड्यात वाडीवस्थित आज रस्तोरस्ती दाट झाडी वाढलेली दिसत आहे, अश्यातच जंगली जनावरांची भीती आता गावा गावांत वाढत चालली आहे. त्यामुळे गावांतील वाड्यांतील मुख्य रस्ते, पायवाटा स्वछ ठेवणे अत्यावश्यक आहे.
गेली कित्येक वर्षे विकासापासून स्थानिक प्रशासनाने वंचित ठेवलेल्या आंगवली गावकर वाडी वस्तीला आता अमित रेवाळे यांच्या वतीने नवा राजकीय सामाजिक उदय दिसत आहे. स्वतःच्या खिशाला भार देऊन अमित रेवाळे हे गावात व पंचक्रोशीत नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यामुळे आता देखील त्यांनी स्वखर्चाने आंगवली रेवाळेवाडी मुख्य रस्ता ते गावकर वाडी येथील सलग ३ वर्षे साफसफाई केली.
अमित रेवाळे यांच्या कोणत्याही प्रशासकीय पदावर नसताना देखील लोकोपयोगी कामांमुळे गावातून थोरामोठ्यांच्या आशिर्वाद आणि कौतुकास्पद शब्दांचा वर्षाव होत आहे. रेवाळे यांच्या समाजकार्याची दाद गावातील नागरिक येणाऱ्या काळात नक्कीच घेतील अशी आशा आहे हे लक्षात येते.




