मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कांदिवली येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित श्री. अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री. राजू देसाई यांचे स्वराज्याचा अपरिचित इतिहास या विषयावर उद्या, रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जनरल करिअप्पा उड्डाणपुलाजवळ, राजेंद्र नगर, बोरीवली पूर्व येथील शिवसेवा सामाजिक शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्या सायंकाळी सहा वाजतां हे व्याख्यान होणार असून श्री अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक वसंत तांबे आणि श्यामराव कदम यांनी दिली.




