Sunday, November 9, 2025
घरमहाराष्ट्ररोटरी क्लब आँफ देवनार यांच्या वतीने कोदिवेल आणि साळोख तेथील शांळाना सोलार...

रोटरी क्लब आँफ देवनार यांच्या वतीने कोदिवेल आणि साळोख तेथील शांळाना सोलार सिस्टीम चे वाटप

नेरळ : रोटरी क्लब आँफ देवनार, मुंबई (डि.३१४१) यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोदिवले आणि साळोख या ठिकाणी सोलार सिस्टम लावण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात गेल्या २५ वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक, आरोग्यविषयक, शुध्दजल, क्रिडा, सौचालय बांधणे, मूलींना सायकल वाटप, महिला सक्षमीकरणासाठी पिंक आँटो रिक्षा देणे, शाळांमध्ये ईलर्निंग प्रणाली आदीसांरखे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहे.

आज या सोलार सिस्टम प्रणालीचे अनावरण कोदिवले येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले यावेळी सदर कार्यक्रमास रोटरी क्लब आँफ देवनारच्या अधक्ष्या श्रीमती अल्का मुरली, रोटरी ग्रामीणचे अध्यक्ष श्री.कन्नन, ज्येष्ठ रोटरीयन श्री.झंकार गडकरी, राजू जोशी, अशोक नाईक, कर्जत तालुका रोटरी समन्वयक श्री. अर्जुन तरे, सोलार सिस्टीमचे पराग कानेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोळी गुरूजी, शिक्षकगण तसेच ग्रामस्थ जनार्धन तरे, केशव तरे, पोलिस पाटील शेखर तरे, ग्रामपंचायत सदस्य मानसी तरे, भगवान तरे, गोपाळ तरे, रघुनाथ तरे, विदयार्थी आणि पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळी गुरूजी म्हणाले की, या उपक्रमाबाबत आम्ही रोटरी क्लब आँफ देवनार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच श्री अर्जुन तरे यांच्या विशेष प्रयत्नांनी हे उपकरण आम्हाला उपलब्ध होऊ शकले आणि यामुळे शाळेला नक्कीच फायदा होईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा