ताज्या बातम्या

कोविड योद्धा पोलीस ज्ञानदेव वारे यांचा मनसेतर्फे सन्मान

धारावी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धारावी विधानसभा कार्यालयात आज कोविड काळातील अतुलनीय सेवा बजावणारे पोलीस अधिकारी श्री. ज्ञानदेव वारे यांचा सन्मान करण्यात आला.

कोविडच्या भीषण काळात समाजसेवेचे अद्वितीय उदाहरण घालून देत वारे साहेबांनी १५०००० पेक्षा अधिक बेवारस मयतांचे अंत्यसंस्कार केले, त्यापैकी ५०००० हून अधिक अंत्यसंस्कार कोविड काळात पार पाडले. त्यांच्या या निःस्वार्थ आणि मानवतावादी कार्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि शाल देऊन गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मनसेचे उपविभागाध्यक्ष कौशिक शांताराम कोळी, मनसैनिक समीर राजेंद्र भोईटे, शाखाध्यक्ष संदीप अविनाश कदम, तसेच मनसे रणराघिणी भक्ती तिखे व सुरेखा भगत उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वारे साहेबांच्या धैर्य, समर्पण आणि समाजसेवेच्या भावनेचे कौतुक केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान करून समाजातील खऱ्या नायकांना सलाम केला आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top