
विंग(प्रताप भणगे) : विंग ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर विद्यमान सदस्य श्री. बाबुराव भीमराव खबाले (बाबू काका) यांनी ग्रामपंचायतीच्या २४x७ नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले.
या कार्याची दखल घेऊन, विंग ग्रामपंचायत मासिक सभेत दिनांक २३ जून २०२३ रोजी, विद्यमान सरपंच सौ. शुभांगी खबाले, उपसरपंच श्री. सचिन दादा पाचुपते, ग्रामविकास अधिकारी श्री. किसन रोंगटे (अण्णासाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
या सभेत उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी श्री. बाबुराव (बाबू काका) खबाले यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला.
याबाबत आज, विंग ग्रामपंचायतीच्या वतीने, सन्माननीय श्री. बाबुराव खबाले (बाबू काका) यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमासाठी विद्यमान सरपंच सौ. दिपाली पाटील, उपसरपंच श्री. संतोष कासार पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री. विकास पाटील साहेब, सदस्य श्री. सचिन पाचुपते (दादा), श्री. विकास माने (अण्णा), श्री. शंकर ढोणे सर, श्री. संजय खबाले, श्री. विठ्ठल राऊत (दादा) तसेच सौ. शुभांगी खबाले, सौ. प्रियांका कणसे, सौ. अश्विनी माने, सौ. साधना कणसे, सौ. पुनम डाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावाच्या सामाजिक, राजकीय, सहकारी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात श्री. बाबू काका यांचे अनमोल योगदान भविष्यातही लाभावे, अशी शुभेच्छा ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
