कराड(प्रताप भणगे) : सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री निनाई देवी विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी श्रुती गणेश थोरात हिने ज्युदो या खेळात आपले कौशल्य दाखवत १७ वर्षाखालील मुलींच्या ६३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
क्रीडा शिक्षक आनंदराव जानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुतीने सातत्यपूर्ण सराव करून हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातही नवी ओळख निर्माण केली आहे.
श्रुतीच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव माने, तसेच आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर यांच्यासह तुळसण, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रुतीचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
श्रुती थोरात हिच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशासाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
