कराड(प्रताप भणगे) : घोगाव (ता. कराड) संतकृपा शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेजमध्ये भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले (बाबा) यांच्या पुढाकाराने व तहसील कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये कराड दक्षिण मतदारसंघातील उंडाळे विभागातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व डोमिसाइल प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार श्री. बाजीराव पाटील होते. यावेळी काॅलेज ऑफ डी. फार्मसीच्या प्राचार्या सौ. वैशाली पाटील, महसूल अधिकारी सौ. तृप्ती दाते, भाजपा कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री. प्रविण साळुंखे, अॅड. बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष श्री. पंकज पाटील, माजी उपसरपंच सवादे श्री. संजय शेवाळे, माजी सरपंच टाळगाव श्री. आण्णासाहेब जाधव, माजी सरपंच म्हासोली श्री. आण्णासाहेब शेवाळे, चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव मा. अक्षय शेटे, उपसरपंच घोगाव श्री. निवास शेवाळे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव श्री. बाजीराव शेटे (सर), माजी चेअरमन टाळगाव श्री. अशोक पाटील, माजी उपसरपंच लोहारवाडी श्री. बाबासाहेब पवार, पै. परशुराम गोंदळी, श्री. बाबासाहेब साळुंखे, श्री. रविंद्र सपकाळ, श्री. पोपटराव साळुंखे, श्री. सुरेश मोहिते, श्री. साहेबराव साळुंखे, मा. संभाजी नांगरे, श्री. प्रकाश पाटील (आबा), तसेच येळगाव जिल्हा परिषद गटातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आवश्यक सरकारी दाखले सहज उपलब्ध झाले असून, शिबिराच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
