

मुंबई : शिधावाटप कार्यालय, धारावी आणि दौलत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी विशेष ई-केवायसी तसेच इष्टाकं शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास उपनियंत्रक, शिधावाटप, अ-परिमंडळ मा. सौ. माधुरी शिंदे, शिधावाटप अधिकारी श्री. प्रशांत गोळे तसेच दौलत फाउंडेशनच्या प्रमुख सल्लागार श्रीमती आयेशा खान उपस्थित होत्या.
या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शिधापत्रिका अद्ययावत करणे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अशा उपक्रमांमुळे गरजूंपर्यंत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
