ताज्या बातम्या

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन

मुंबई : आयसीसी महिला विश्र्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले.

भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय़ देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top