Monday, November 3, 2025
घरमहाराष्ट्रपैलवान डॉ. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे सामाजिक उपक्रम

पैलवान डॉ. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे सामाजिक उपक्रम

ईश्वरपूर(प्रताप भणगे) : वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथे पैलवान डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदि

वसानिमित्त टायगर ग्रुप वाळवा तालुका उपाध्यक्ष शरद निकम यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी लाडवांचा प्रसाद वाटप करण्यात आला तसेच रमेश भीमराव पवारसंतोष भीमराव पवार यांचा नाथाचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बाहेरून आलेल्या शेततळ मजुरांना पाण्याच्या बाटल्या आणि संसारोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमास किल्ले मच्छरगावचे उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पोपट लाहगडे, चेतन डुबल, गणेश जाधव, संपत कांबळे, मच्छिंद्रनाथाचे पुजारी सुनील नाना शिंदे, वरद निकम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments