मुंबई : उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावी येथे भव्य ‘विजय संकल्प महारॅली’ आयोजित करण्यात आली. या रॅलीदरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी धारावीचे विभागप्रमुख भास्कर शेट्टी,विधानसभा प्रमुख प्रवीण जैन, शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शाखा व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साह, घोषणाबाजी आणि भगव्या झेंड्यांच्या लाटेमुळे संपूर्ण परिसर शिवसेना-मय झाला होता.
शिवसेना उपनेते व खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीसोबतच ‘झेंडा व स्तंभ रोपण’ उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी धारावी विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून कार्यकर्त्यांनी जनसंपर्क साधला आणि नागरिकांना शिवसेनेच्या विकासकार्यासंबंधी माहिती दिली.
या रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी “जय महाराष्ट्र!, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना विजयी होणारच!” अशा घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

