Sunday, August 31, 2025
घरदेश आणि विदेशराहुल शेवाळे जैसा है कौन? धारावीतील रॅपर्स कडून राहुल शेवाळे यांना अनोखी...

राहुल शेवाळे जैसा है कौन? धारावीतील रॅपर्स कडून राहुल शेवाळे यांना अनोखी भेट

मुंबई : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे समर्थन करा धारावी मधील रॅपर्स बुधवारी सकाळी धारावीच्या रस्त्यांवर उतरले. रॅपर्सच्या या अनोख्या स्टाईल ने स्थानिक खुश झाले.

धारावीतील रॅपर टोनी सेबॅस्टियन याने स्वतःहून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी एक रॅप तयार केलं. या गाण्यात शेवाळे यांच्या खासदरकीच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असून त्यांचं मुंबईच्या विकासासाठी असलेले व्हिजन याबाबत माहिती दिली आहे. “राहुल शेवाळे जैसा है कौन?” असा थेट प्रश्न या रॅप मध्ये टोनी यांनी विचारला आहे. हे रॅप तयार करून टोनी यांनी आपल्या मित्राच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. आता हे रॅप गात टोनी आणि त्यांचे मित्र धारावीतील गल्ल्यांमध्ये फिरून जनजागृती करताहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments