सातारा(अजित जगताप) : रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आयोजित विलो मदर अँड प्लांट पंप प्राइवेट लिमिटेड यांच्या सीएसआर सहाय्यता निधीतून भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे तर्फे रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील परम पूज्य श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट मध्ये हे शिबिर होणार असल्याची माहिती दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख विश्वस्त विनय खटावकर, पुसेगाव देवस्थान ट्रस्ट रणधीर जाधव, लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे सुहास जोशी यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र
मोफत दिव्यांग शिबिर पुसेगाव (ता. खटाव) दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिव्यांग पूर्व नोंदणी करणाऱ्या दिव्यांगांसाठी हे शिबिर होत आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट आयोजित विलो मॅदर अँड प्लॅट पंप्स प्रा.लि. यांच्या (C.S.R.) निधीतून
भारत विकास परिषदेचे दिव्यांग केंद्र, पुणे तर्फे
३०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर पुसेगाव दि. १६ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोजमाप शिबीर होणार आहे.
प.पू.श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, खटाव,भारत विकास परिषद वतीने ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षांपासून अखंड कार्यरत आहे.
भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, व कॅलिपर बसविण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एपिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली.
या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित पत्रकार परिषदेला सामाजिक जाणीव ठेवून २५ ते ३० स्थानिक पत्रकार समवेत कार्यकर्ते उपस्थित होते. पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे श्री. रणधीर जाधव यांनी उपस्थितांचे
स्वागत केले तसेच लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट, खटावचे श्री. सुहास जोशी यांनी शिबिराची प्रस्तावना केली. विश्वस्त व
दिव्यांग केंद्रप्रमुख श्री.विनय खटावकर पुणे, यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी माहिती
दिली. माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु. ५० हजारापेक्षा जास्त असून असे कृत्रिम
पाय ह्या शिबिरात ३०० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड
असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे,
वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते.
पुसेगाव परिसरातील आणि सातारा व जवळपासच्या सर्व जिल्ह्यांतील दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी फोन द्वारे
पूर्व नोंदणी करावी. (पूर्व नोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही.) दिव्यांग बांधवांनी यासाठी
संपर्क-कुलकर्णी – 94220 29946 विनोद – 9881138052 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
प.पू.श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव येथे रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व दिव्यांगांची
कृत्रिम अवयवासाठी मापे घेण्यात येणार आहेत. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय आहे. रोटरी क्लब ऑफ
पुणे वेस्टचे अध्यक्ष श्री. संतोष चिपळूणकर यांनी आभार व्यक्त केले.
या शिबिरासाठी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुजाता खटावकर,
सुधीरा अभ्यंकर,
स्मिता जोशी, विनायक भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
