कुडाळ (अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात प्रथमच जातीय मनोमिलनाचा योगायोग जुळून आलेला आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटातील आनेवाडी येथील ओ.बी.सी. लेक व मराठा समाजाची सून असलेल्या व पदवीधर शिक्षण घेऊन स्वकर्तबगारीवर धाडसी निर्णय घेणाऱ्या रुचिता फरांदे – शिंदे यांच्या नावाला मतदारांची पसंती असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनाही चांगलेच बळ मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेच्या व जावळी पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहत आहे. ठेकेदार मुक्त उमेदवार दिला तरच मताची टक्केवारी वाढणार आहे. हे सुद्धा यानिमित्त अधोरेखित झालेले आहे. कुडाळ जिल्हा परिषद गट हा ओ.बी.सी. महिलांसाठी राखीव झाल्यामुळे ओबीसी घटक असलेल्या अनेक जातीतील प्रामाणिक व सामाजिक जाण असलेल्या महिलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बहुसंख्येने ओ.बी.सी. मतदार असलेल्या या कुडाळ जिल्हा परिषद गटात मराठा समाजाचीही मते ओ.बी.सी., मागासवर्गीय, अल्पसंख्याकांपेक्षा जास्त आहेत. हीच मते निर्णायक ठरणार आहे .
जावळी पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण सभापती महिलांच्या जागी ओ.बी.सी. महिलांना संधी दिली होती. आता ओ.बी.सी. समाजातील लेक व मराठा समाजाची सून असलेल्या आनेवाडी येथील कर्तबगार महिला रुचिता फरांदे- शिंदे यांच्या नावावर जिल्ह्यातील अनेक मातब्बर मंडळींनी शिक्कामोर्तब केला आहे. अशी माहिती मिळाली आहे.
परिवर्तनवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या फरांदे कुटुंबीय व शिंदे कुटुंबीय यांच्याबद्दल सर्व समाजामध्ये आदराचे स्थान आहे. जातीय जोखंड झुगारून चांगल्या विचारांची कास धरल्यामुळे कुडाळ जिल्हा परिषद गट हा परिवर्तनाचा बालेकिल्ला ठरणार आहे. सध्या कुडाळ गटात सार्वजनिक बांधकाम मंत्री व नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, प्रवीण देशमाने, मुरलीधर शिंदे, समाधान गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या विचार विनिमयाने उमेदवारी जाहीर होणार आहे. नेतेगण सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कुणबी मराठा व ओ.बी.सी. यांच्या मध्ये मतभेद नसले तरी तशी चर्चा होत आहे. त्यामध्ये कुडाळ गटात पर्याय म्हणून रुचिता फरांदे– शिंदे हाच एकमेव पर्याय जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कलाटणी देणार ठरणार आहे.
कुडाळ गटामध्ये सरताळे, कुडाळ, पानस पु., सर्जापूर, बामणोली तर्फ कुडाळ, भिवडी, सोनगाव, सांगवी तर्फ कुडाळ, आर्डे, बेलावडे, मरडमुर्हे,मोरघर.
कुडाळ गणातील ही गावे येतात.
खर्शी तर्फ कुडाळ, प्रभुचीवाडी, आनेवाडी, रायगाव, महामुलकरवाडी, सायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, पवारवाडी, दरे खुर्द, नरफदेव, मोरावळे, केंजळ, केसकरवाडी, वाघेश्वर, भणंग, कुंभारगणी, ओझरे, रिटकवली, बिभवी, आगलावेवाडी, जवळवाडी या गावांचा समावेश आहे. याच गावामध्ये माळी व मराठा समाज यांचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. दोन्ही समाजातील मतदारांना नैतिकदृष्ट्या आपलाच उमेदवार असल्याचा भास होणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांना सकारात्मक रित्या विचार करावा लागणार आहे. शेवटी सर्वच महिला उमेदवार आदरणीय व सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे आहेत. त्यांना इतर ठिकाणी संधी देऊन त्यांच्या गुणवत्तेला वाव द्यावा अशी मागणी होत आहे.
कुडाळ परिसरात ओ.बी.सी. महिलांनी निर्भीडपणाने पुढे येऊन सामाजिक कार्यात झोकून दिलेले आहे. परंतु आनेवाडी येथील रुचिता फरांदे– शिंदे यांनी कृतीतून जातीय सलोखा निर्माण केलेला आहे. त्या दृष्टीने ते प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्याकडे मतदाराही पहात आहे.
कुडाळ गटात जातीय मनोमिलनाने मतदारांचीही ओ.बी.सी. लेकीला पसंती….
RELATED ARTICLES