स
ातारा(अजित जगताप ) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन व बदल घडवणारे शिवसेनेचे स्वाभिमानी नेते व सातारचे सुपुत्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा शहर दौऱ्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्याला बळ देण्याची सूचना त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली.
बुधवारी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने सातारा शहरात दाखल झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट दिली . त्या ठिकाणी जिल्ह्यातील वीर पत्नीला शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसैनिकांचा मेळावा झाला. या विविध कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, युवा नेते अंकुश कदम, एकनाथ ओंबळे, सुरेश मोरे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट ,माजी सैनिक संघटनेच्या सौ. विद्या बर्गे, प्रशांत तुपे, यशराज देसाई, राजू केंजळे जेष्ठ शिवसेना नेते प्रभाकर काका, बाबा कदम, शरद कणसे, शिवाजीराव पाटील, प्रदीप भोसले, संदीप शिंदे, राहुल बर्गे, सुरेश मोरे, प्रशांत भोसले, संदीप पवार, विलास शिंदे यांच्यासह मान्यवर शिवसेना पदाधिकारी व महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे सातारा जनसंपर्क कार्यालय या ठिकाणीही ते त्यांनी भेट दिली.
त्यानंतर सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
प्रस्ताविक करताना पालकमंत्री देसाई म्हणाले, महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला महाराष्ट्र स्थान असले पाहिजे. त्याच पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. पन्नास आमदारांनी विश्वासाने त्यांच्याकडे नेतृत्व दिले आहे. जावळीचे एकनाथ ओंबळे यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. गर्दीतही ते त्यांना बोलवून त्यांच्या अडचणी समजून घेतात. त्यामुळे शिवसेना खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, आपत्ती तिथे शिवसेना… संकट तिथे एकनाथ शिंदे… हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करत आहे. आमची देना बँक असून देना बँक नाही. २०१९ साली घेतलेली भूमिका मान्य नसल्यामुळे २०२२ साली परिवर्तन घडवले. शिवसेनेकांच्या मनात जे होते ते घडवून टांगा पलटी घोडे फरार केले. हे करत असताना सत्तेवर पाणी सोडून आम्ही पाय उत्तर झालो. आता आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. म्हणूनच महायुतीला बहुमत दिले आहे. विकासाचे आणखीन प्रकल्प राबविण्यात आलेले आहे. झालेली कामे मोजायला गेलो तर दिवस पुरणार नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले,२३२ महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरत असून लाडक्या बहिणीने इतिहास घडवला आहे. कारण या लाडक्या बहिणींमुळे सत्तेवर आलो आहोत तर महाविकास आघाडीचे स्वप्न भंग होऊन त्यांचे हॉटेलचे बुकिंग कॅन्सल करावे लागले. आता अडीच वर्षात दुसरी इनिंग सुरू झालेल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. निवडणुका आल्या की बूथ व गटप्रमुखाची आठवण होते. त्यांची कायम आठवण राहिली पाहिजे. कार्यकर्ता आपल्याला निवडून देतो. मोठा करतो. आता आपली जबाबदारी कार्यकर्त्याला मोठे करण्याची आहे .असेही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.विशेष बाब म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये शिवसैनिक ऐवजी कार्यकर्ता हा शब्द सातत्याने येऊ लागल्यामुळे शिवसेना कात टाकत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यावेळी धारकऱ्यांनी तसेच सासवड येथील बालिकेच्या हत्याप्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी अनेकांनी निवेदन देऊन आपले प्रश्न मांडले. धारकर यांनी सभागृहाच्या बाहेर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते सभागृह सोडून निघून गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सैनिक स्कूलच्या हेलिपॅड वर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की सहन करावी लागली. प्रथमच सातारा शहरात शिवसैनिकांची गर्दी पाहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोरेगाव व पाटणमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण महायुतीमध्ये आपली ताकद निर्माण करू शकते. याची चुणूक पाहण्यास मिळाली. बऱ्याच दिवसांनी आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.
____________________
फोटो — सातारा शहरात शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचे क्षणचित्रे (छाया– अजित जगताप सातारा)