Wednesday, October 15, 2025
घरमहाराष्ट्रपालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी विलास पोतनीस यांची नियुक्ती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांकडून...

पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी विलास पोतनीस यांची नियुक्ती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांकडून सन्मान

पालघर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी आमदार विलास पोतनीस यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी विभाग क्र. १ तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महिला विभाग संघटक सौ. शुभदा शिंदे, मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शशिकांत झोरे, दहिसर उपविभागप्रमुख विनायक सामंत, बोरिवली उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखाप्रमुख विशाल पडवळ तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पोतनीस यांनी पक्षाची विचारधारा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी अखंड प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्तारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments