ताज्या बातम्या
ऐरोलीतील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई; स्त्रीरोगतज्ज्ञ निलंबित, उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त, पीडितेला न्यायाची अपेक्षाॲट्रॉसिटी प्रकरणांतील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; जलदगती न्यायालये आणि साक्षीदार संरक्षणावर मुख्यमंत्र्यांचा भरजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, आरडीसींच्या अधिकारांचे ‘नवे’ वाटप जाहीर • उपजिल्हाधिकाऱ्यांनाही थेट जबाबदारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री बावनकुळेंचा ॲक्शन प्लॅनहाफकिनच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक; खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही – मंत्री नरहरी झिरवाळआझाद मैदानात कामगारांचा एल्गार; ‘४ श्रम संहिता रद्द करा’, राज्यभरातील संघटनांचा सरकारला इशारा

संतप्त विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी बिबट्याला ठार मारण्याचा कायदा करा

मुंबई(रमेश औताडे) : शाळेत जात असताना एका विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर बिबट्याच्या नखांचे व दातांचे खोलवर ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत. जखमी विद्यार्थिनीला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने बिबट्याला मारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी समोर येत आहे.

संगमनेर तालुक्यातील डिग्रस माध्यमिक विद्यालयाच्या एका विद्यार्थिनीवर सकाळी शाळेत जाताना बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमची मागणी मान्य करा अन्यथा पालक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Scroll to Top