ताज्या बातम्या

सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांचे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणारे, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेले विधान ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री बाळासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा बळीराजा या वर्षीच्या अस्मानी संकटाने पूर्ण उद्ध्वस्थ झाला आहे, त्याला भरी मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. लाडक्या उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचे कर्जमाफ करतानाच काय होते, असा सवाल करत कर्जमाफीचा नाद लागला असे म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे विधान करताना जीभ कशी झडली नाही. विकृत नाद हे भाजपाच्या नेत्यांना व मत्र्यांना आहेत असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top