Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची तयारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाची तयारी

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या नव्या युगात प्रवेश करण्यास सज्ज झाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) उड्डाणासाठी तयार आहे. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन होणार आहे. विमानतळाला सामाजिक कार्यकर्ते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. अत्याधुनिक सुविधा, हरित संकल्पना आणि टिकाऊ पायाभूत रचना.

पहिला टप्पा पूर्ण

  • खर्च : १९,६४० कोटी रुपये.
  • संपूर्ण प्रकल्पाची किंमत : अंदाजे १ लाख कोटी रुपये.
  • वार्षिक प्रवासी क्षमता (पहिला टप्पा) : २० दशलक्ष.
  • प्रारंभी दररोज उड्डाणे : ६०.
  • सहा महिन्यांत वाढ : २४०-३०० उड्डाणे.
  • सर्व चार टप्पे पूर्ण झाल्यावर प्रवासी क्षमता : ९० दशलक्ष.

उड्डाण सेवा

  • उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट.
  • प्रारंभी ४:१ प्रमाणात देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय मार्गांचे संतुलन.
  • मागणीनुसार आंतरराष्ट्रीय मार्गांची संख्या वाढवली जाईल.

कनेक्टिव्हिटी

  • NMIA भविष्यात भारतातील सर्वाधिक जोडलेला विमानतळ ठरणार.
  • रस्ते, रेल्वे, मेट्रो, जलमार्ग आणि हवाई टॅक्सी सेवा आराखड्यात.
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)मुळे दक्षिण मुंबई–NMIA प्रवास : ३०-३५ मिनिटे.
  • विमानतळ परिसरात एरोसिटी – हॉटेल्स, व्यावसायिक केंद्रे, लॉजिस्टिक हब.

आर्थिक विकास

  • रायगड, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हजारो रोजगार निर्मिती.
  • गुंतवणुकीचा वाढता ओघ, पायाभूत सुविधांचा विकास.
  • CSMIA वरील प्रवासी ताण कमी होणार.
  • पुढील टप्पे पूर्ण होण्याची वर्षे : २०२९, २०३२, २०३६.

डिझाइन आणि वास्तुशास्त्र

  • लंडनस्थित झाहा हदीद आर्किटेक्ट्स यांनी डिझाइन केले.
  • टर्मिनल इमारत कमळाच्या आकारात – तरंगत्या कमळासारखी रचना.
  • १२ विशाल शिल्पात्मक स्तंभ – अजिंठा-वेरुळ लेण्यांमधून प्रेरणा.

पहिल्या टप्प्यात वार्षिक मालवाहतूक क्षमता : १० दशलक्ष टन आहे. भविष्यात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणून विकसित होणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments