Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रसीमेवरील सैनिकांचे ऑनलाईन औक्षण -आजी माजी सैनिकांंचा सन्मान ...

सीमेवरील सैनिकांचे ऑनलाईन औक्षण -आजी माजी सैनिकांंचा सन्मान -व्याख्यानमालेची सांगता

ाई(विजय जाधव) : देशासाठी सीमारेषेवर जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आपल्या गावच्या जाबाज सैनिकांना ऑनलाईन औक्षण करून कृतज्ञता व्यक्त केली. वयगाव गावाने एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
या गावाने सामाजिक भान ठेवून राबविलेले स्तुत्य उपक्रम आदर्श ठरतील. देशप्रेम, ग्रामविकास, सामाजिक बांधिलकीचे दैदिप्यमान उदाहरण सर्वांसमोर ठेवल्याचे प्रतिपादन रुपाली परिट यांनी केले.वयगाव ( वाई) येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गावातील महिलांनी सैनिकांना ऑनलाईन औक्षण केले, तर उपस्थित आजी-माजी सैनिकांना प्रत्यक्ष औक्षण करून गौरविण्यात आले.
या प्रसंगी रूपाली विजयकुमार परीट (सौभाग्यवती गटविकास अधिकारी, वाई) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम पार पडला. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. “आपण सुरक्षित जीवन जगत आहोत ते फक्त आपल्या सैनिकांमुळे” या भावनेतून गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन त्यांना सलामी दिली.*सैनिकांचा केला सन्मान*१) सुभेदार महादेव गेनूबा वाडकर (एअर फोर्स)
२) नारायण विष्णू वाडकर
३) प्रसाद रमेश धनावडे
४)तेजस रमेश वाडकर
५)शैलेश दिनकर वाडकर
५)अमोल विजय वाडकर
यांना ऑनलाईन औक्षण केले. त्यानंतर सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत रंगला. “जय जवान जय किसान” या घोषणेची आठवण करून ग्रामस्थ महिलांनी शेतकरी व गाईंच्या ओटी भरून किसानांचा गौरव केला.यावेळी उपस्थितांनी
प्रदूषणमुक्त सण साजरा करण्याची शपथ घेत प्लास्टिक बंदी, डॉल्बीबंदी, भोंगेबंदी, फटाके बंदी , वीज बचतीचा संकल्प करण्यात आला.वयगावात गेली ९ दिवस सार्वजनिक व्याख्यानमालेत भारतीय संस्कृती, स्त्रीशक्ती, पालकांसमोरील आव्हाने, मम्मी, मोबाईल व मुले, पर्यावरण संवर्धन, ‘समृद्ध वयगावचा वारसा’ असे विविध विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.खेळ, पारंपरिक वाद्यांचे सूर, संगीत खुर्ची यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत आणली. शेवटी सैनिकांना सलामी देत ‘स्वच्छ, समृद्ध व प्रदूषणमुक्त वयगाव’ घडवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments