न


नवी मुंबई : विजया दशमीनिमित्त साईनाथ महाराजांचा साई लिला महिला मंडळाच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर ५ व ८ येथील साईबाबा मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे अभिषेक, पूजन व महाआरतीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.या कार्यक्रमात मंडळाच्या पदाधिकारी उर्मिला हिंगे, सुषमा वरखडे, दिपाली संकपाळ, शालन शेलार, गौरी शेलार, उज्ज्वला बांदल, पुष्पा डिगे, जया सरजिणे, प्रियंका वरखडे, निलम काळबागे, पल्लवी जाधव, नीता शेलार, मंजूश्री वरखडे, कांचन संकपाळ, कांता आहेर, सविता शेट्टे, प्रणिता ठाकूर, कु. वैभवी हिंगे, कु. प्राची हिंगे, कु. प्राची सरजिणे यांसह अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.गुढीपाडवा व विजयादशमीच्या दिवशी साईनाथ महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्याची परंपरा मंडळाने जपली असून, या वेळीही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला समाजसेवक नितीन हिंगे, समाजसेवक सचिन वरखडे, SVM स्कूलचे रमेश संकपाळ सर, DDM न्यूजचे संपादक भीमराव धुळप, अमोल बांदलशेठ, नितीन काकडे, साहेबराव आहेर, सोमन कदम, मुकेश ठाकूर, मनोहर जाधव, बाबाजी सरजिणे, अरुण शेलार, निखिल वरखडे, नितीन वरखडे, कु. सार्थक वरखडे यांसह मान्यवर उपस्थित होते.धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भीमराव धुळप यांनी साई लिला महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.




