ताज्या बातम्या

महाबळेश्वर येथे विजयादशमी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

महाबळेश्वर (नितीन गायकवाड) – भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष आयु. नितीन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस अनिल सपकाळ यांनी केले तर धार्मिक विधी बौद्धाचार्य रमेश पवार यांच्या वाणीतून संपन्न झाला. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला रघुनाथ घाडगे, प्रकाश सपकाळ, बबन पवार, सखाराम कदम, सतीश भालेराव यांसह अनेक सैनिक उपस्थित होते.

भिमक्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव तसेच आयु. नितीन गायकवाड यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधन करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास आयु. एकनाथ भालेराव, किसन कांबळे, सुरेश घाडगे, संजय कदम, संदीप तांबे, दिलीप कांबळे, संपत मोरे, सूरज कांबळे, रत्नकांत भालेराव, संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top