सातारा : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते मुदत किया आंदोलन केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सदर प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. श्री उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही खरी भेट ठरले आहे.
कोरेगाव ते वाठार स्टेशन रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे अपघात होत आहे. त्यामुळे शिव समर्थ कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काळया यादीत नाव टाकावे. वंदना रिसीजन्सी सर्वे नंबर 63 ब प्लॉट नंबर 6 न्यू विकास नगर खेड येथील आठ अनाधिकृत बांधकाम तात्काळ पाडावे. पूर क्षेत्रातील वाढे तालुका जिल्हा सातारा येथील अनाधिकृत प्रकल्प जयश्री स्थितीत बंद करावे व इतर मागण्यांसाठी गेली आठवडाभर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात श्री उबाळे यांचे आंदोलन होत असून त्याला वाढता पाठिंबा मिळत आहे. कोरेगाव चे आजी-माजी आमदारांनी भेट दिली आहे. परंतु, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांनी याची दखल घेऊन तातडीने बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बेमुदत ठिय्या आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, शेतकरी संघटनेचे विजय पाटील, आरपीआयचे अशोक गायकवाड व बापूसाहेब लांडगे, रेखा सकटे, संजना जगदाळे, बाबुराव चव्हाण, महेश रणदिवे आदी मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.