प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आत्मसात करणाऱ्या जय शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या आदेशाने समाजसेवक व पूर्वी शिवसंग्रामचे सरचिटणीस असलेले शशिकांत शिरसेकर यांची मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मराठा नेते कै. आम.विनायक मेटे संस्थापक अध्यक्ष शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख यांच्या विचाराने चालणाऱ्या या संघटनेतेची महाराष्ट्रात पुन्हा बांधणी करण्यासाठी त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू रामहरी तुकाराम मेटे यांनी महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्यासाठी व प्रामुख्याने मुंबई सारख्या आर्थिक राजधानीत पक्ष बळकट करण्यासाठी शिवसंग्राम पक्षात सरचिटणीस पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारे समाजसेवक शशिकांत शिरसेकर यांच्यावर मुंबई प्रदेश अध्यक्ष ही जबाबदारी महाराष्ट्र अध्यक्ष रामहरी मेटे यांनी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक संघटना, सामाजिक संस्था व विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जय शिवसंग्रामच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी शशिकांत शिरसेकर यांची नियुक्ती
RELATED ARTICLES