Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रसंदीप डाकवेंकडून पद्मश्री अच्युत पालव यांना 16000 वी कलाकृती भेट

संदीप डाकवेंकडून पद्मश्री अच्युत पालव यांना 16000 वी कलाकृती भेट

तळमावले/वार्ताहर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांना अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी त्यांच्या नावात रेखाटलेल्या अक्षर गणेशाची कलाकृती भेट दिली. डाकवे यांच्याकडून दिली जाणारी ही तब्बल 16,000 वी कलाकृती आहे.
“अरे वा..!, क्या बात है” अशा शब्दांत पाठीवर कौतुकाने थाप टाकून अच्युत पालव यांनी अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचे कौतुक केले.
जागतिक स्तरावर गौरवलेल्या पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून मिळालेल्या शाबासकीच्या थापेने डाकवे भारावून गेले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध चित्रकार प्रा.सत्यजित वरेकर, ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार, प्रा.सतीश उपळावीकर, कलाशिक्षक किरण कुंभार, अक्षरगुरु राहुल पुरोहित, प्रशांत लाड, झहीर शेख तसेच कराड तालुक्यातील अनेक चित्रकार उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून यूट्यूब, फेसबुक व अन्य सोशल माध्यमांवर अच्युत पालव यांच्या सुलेखनाची प्रात्यक्षिके पाहत होतो. आज त्यांचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पहायला मिळाले. त्यांचा स्पर्श झाला, त्यामुळे मी खूप आनंदी झालो असून माझ्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप मारली, हा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे.अशा शब्दांत अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

*चौकटीत : संदीप डाकवे यांचा 16 हजार चित्रभेटीचा असा झाला प्रवास :*
संदीप डाकवे यांनी 100 वी कलाकृती अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर, 500 वी पद्मश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वी अभिनेते भरत जाधव, 2000 वी अभिनेते सुबोध भावे, 3000 वी अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वी गायिका कविता राम, 5000 वी एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वी अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, 7000 वी एसपी अजयकुमार बन्सल, 8000 वी आरटीओ तेजस्विनी चोरगे, 9000 वी ज्योतिष विशारद सतीश तवटे, 10000 वी अभिनेता रोहन गुजर, 11111 वी कोल्हापूरचे मठाधिपती विद्यानृसिंह भारती, 12000 वी आदिमठाध्यक्ष धारेश्वर महाराज, 13000 वी कलाकृती नाना पाटेकर, 14000 वी कलाकृती माजी संरक्षण मंत्री कृषी मंत्री खा.शरद पवार,
15000 वी कलाकृती महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती सी.पी.सुब्रमण्यम यांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments