Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्र२५ हजाराच्या लाचेप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाळ्यात..

२५ हजाराच्या लाचेप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाळ्यात..

ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. त्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती, मात्र तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना तो जाळ्यात सापडला.मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात मदत करतो, असे आश्वासन देऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित झाली. भालेरावने २४ सप्टेंबर २०२५ रोजी लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदाराने तातडीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने २५ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत भालेराव यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments