वाई(नितीन गायकवाड) : वाई शहरातील उद्योजक प्रशांत पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. श्री काळभैरवनाथ मंदिर, पांडे येथे उपासकांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पुजारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास अक्षय पेटकर, अक्षय सुळके, धनाजी चव्हाण, आविष्कार जेधे, निखिल चव्हाण, विनोद जाधव, मंडळाचे अध्यक्ष हेमंत जाधव, सरपंच स्वप्निल यादव, विकास शिंदे, किशोर जाधव, हरिश्चंद्र चव्हाण, महेंद्र शिरसागर, किशोर जाधव फौजी, दत्तात्रय जाधव (पाटील) आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत देण्याची तयारी पुजारी यांनी व्यक्त केली असून, वाई बसस्थानक परिसरातील गरजूंसाठी सकाळी नाष्टा वाटप देखील करण्यात आले.“सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करावा,” असे आभारप्रदर्शन करताना पुजारी यांनी नमूद केले.






