ताज्या बातम्या

कै. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त मराठा उद्योजक लाभार्थ्यांना धनादेश वाटप

वाशी : कै. आ. अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने २५ सप्टेंबर २०२५ रोजी कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती दिनी कार्यक्रमात महामंडळाच्या व्याज परतावा रकमेचा धनादेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते लाखवड गावचे लाभार्थी प्रिंटींग प्रेस उद्योजक अंकुशशेठ संकपाळ यांना धनादेश प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास वनमंत्री मा. गणेशजी नाईक, सा. बांधकाम मंत्री मा.शिवेंद्रसिंहराजे भोसले, माथाडी कामगार नेते आ. शशिकांत शिंदे व महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले की, “कै. अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न होते की माथाडीचा मुलगा माथाडी म्हणून न राहता उद्योगधंदा करावा किंवा शिक्षण घेऊन उत्तम नोकरी करावी. त्यांचा हा वारसा आज पुढे नेला जात आहे.”

याच परंपरेनुसार, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतः कर्जदारांच्या व्यवसाय उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली होती. अंकुश संकपाळ यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत केली असल्याने त्यांना व्याज परतावा रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात अन्य अनेक लाभार्थ्यांनाही धनादेशाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांना उद्योगधंद्यात व प्रगतीच्या मार्गावर चालण्याचे प्रोत्साहन मिळत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top