Wednesday, October 15, 2025
घरमहाराष्ट्रदिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज...

दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजीची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments