मुंबई(रमेश औताडे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त कमला रायझिंग स्टार्स २.० पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. कमला अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्ट तर्फे आयोजित या कार्यक्रमात शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक सेवा, क्रीडा, उद्योजकता, कला, पर्यावरण व तंत्रज्ञान या विविध क्षेत्रातील ४२ समाजपरिवर्तनकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वर्षीची थीम “ध्रुवतारा” होती. केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा, सावित्री ठाकूर, स्वतंत्र देव सिंग यांसह मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळा उजळला. ट्रस्टी निदर्शना गोवानी यांनी पुरस्कार हे केवळ सन्मान नसून सेवाभाव व चिकाटीला मानवंदना असल्याचे सांगितले.